या उन्हाळ्यात हे व्यवसाय सुरू करा आणि नफा कमवा! कमी गुंतवणुकीत अधिक लाभ.

तुम्हाला ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल ,तर या उन्हाळ्यामध्ये हे व्यवसाय सुरू करा आणि नफा कमवा.चला पाहू कोणते आहेत ते व्यवसाय.

दुधाच्या पदार्थांचे स्टॉल:
उन्हाळ्यात लोकांना ताक, लस्सी, फालुदा या दुधाच्या पेयांची मोठी मागणी असते. यासाठी तुम्ही छोटे स्टॉल उभारू शकता. या स्टॉलसाठी फक्त २-५ हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. शहरातील गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या गार्डनमध्ये हे स्टॉल उभारले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

आंब्याची विक्री:
उन्हाळ्यात आंब्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. आंब्यांची मोठी मागणी असते आणि लोकांना आंब्यांवर खूप पसंती आहे. तुम्ही शेतकरी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून थेट आंबे खरेदी करू शकता. या आंब्यांच्या लहान लहान लाकडी पेट्या तयार करून त्यांची होम डिलिव्हरी देऊ शकता. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर जाहिरात करून व्यवसाय वाढवू शकता.

पापड, लोणचे, मसाले:
महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांमध्ये पापड, लोणचे आणि मसाले या वस्तूंचा मोठा वापर होतो. उन्हाळ्यात या पदार्थांची मागणी खूप असते. तुम्ही लहान लहान पाकिटे बनवून विक्री करू शकता. १०-१५ हजार रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करता येईल.

या सर्व व्यवसायांमध्ये कमी गुंतवणूक करूनही जास्त नफा मिळवता येऊ शकतो. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपुक्त ठरली असेल.माहिती आवडल्यास शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment