उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून ‘या’ टिप्स करा

१. स्वच्छ भांडे वापरा
उन्हाळ्यात दूध गरम करण्यासाठी अगदी स्वच्छ भांडे वापरणे गरजेचे असते. भांड्यात अन्य अन्नपदार्थांचे डाग असतील तर दूध खराब होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी स्वच्छ भांडे वापरा.

२. बेकिंग सोडा वापरा
जेव्हा तुम्ही दूध गरम करत असाल, त्यात एक चिमुटभर बेकिंग सोडा घाला. यामुळे दूध खराब होण्याची शक्यता कमी होते. मात्र बेकिंग सोडा फारच कमी प्रमाणात वापरावा.

३. फ्रिजमध्ये काळजी घ्या
दूध फ्रिजमध्ये ठेवताना काळजी घेणे महत्त्वाचे असते. दूध टोमॅटो रस, चटणी, लिंबू यांपासून दूर ठेवा. तसेच कच्चे मांस किंवा खरबूज यांच्याजवळही दूध ठेवू नये.

४. चारवेळा गरम करा
उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून २४ तासांत चारवेळा दूध गरम करा. २-३ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा. उकळलेले दूध लगेच झाकू नका, तर वाफ निघून जाईल इतकावेळ सोडा.

Leave a Comment