सोयाबीनच्या या 4 जातींची लागवड करा व मिळवा भरघोस उत्पादन आणि उत्पन्नही..

मित्रांनो, भारतात सोयाबीनला येलो गोल्ड म्हणजेच पिवळे सोने असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही सोयाबीनची लागवड केली जाते.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे कॅश क्रॉप उत्पादित होते. दरवर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.

यावर्षी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा असल्याने सोयाबीनच्या लागवडीचे क्षेत्रही काहीसे वाढणार आहे.

सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न मिळवायचे असेल तर सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक आहे. सुधारित सोयाबीन जातींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल.

आज आपण सोयाबीनच्या 4 अशा जातींची माहिती घेणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळणार आहे. यावर्षी तुम्हीही सोयाबीनची लागवड करणार असाल तर या जातींची लागवड करून तुम्हालाही चांगले उत्पादन मिळू शकेल.

सोयाबीनच्या टॉप चार जाती व त्यांच्या विशेषता:

केडीएस 726: ही सोयाबीनची जात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही सर्वाधिक उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते.

काढणीच्या वेळी या जातीच्या शेंगा फुटत नाहीत. ही जात विविध रोगांना प्रतिकारक आहे. ही जात पावसाळ्यातही आणि उन्हाळ्यातही लागवड करता येते. शेतकरी बांधव पावसाळ्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

जेएस 9305: ही सोयाबीनची आणखी एक सुधारित जात आहे. महाराष्ट्रासाठी याची शिफारस केली गेली आहे. ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. विविध रोग व कीटकांमुळे कमी नुकसान होते अशी जात म्हणून ओळखली जाते.

MAUS 612: राज्यातील हवामान या सोयाबीन जातीच्या पिकासाठी अनुकूल आहे. या जातीतून चांगले उत्पादन मिळते असा दावा केला जातो. अवर्षण क्षेत्रात जास्त पाऊस होणाऱ्या भागातही या जातीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.

एमडीएस रुची 2001: ही देखील सोयाबीनची एक लोकप्रिय जात आहे. महाराष्ट्रभर याची लागवड केली जाते. मुख्य सोयाबीन उत्पादक मराठवाडा व विदर्भ भागात या जातीची मोठ्या प्रमाणात शेती होते.

या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे 60 ते 70 दिवसांत ही जात काढणीसाठी तयार होते, म्हणजेच लवकर पिकते. मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment