शेवग्याच्या या सुधारित जातींची लागवड करा आणि मिळवा जबरदस्त कमाई!

मित्रांनो शेवगा हा आपल्या प्रत्येकाला माहीत आहे.तसेच वेगवेगळ्या आजारांवर देखील शेवगा गुणकारी ठरतो.पण शेवग्याच्या वेगवेगळ्या जाती देखील आहेत.त्या लावल्यावर काय फायदा होतो ते आपण आज पाहणार आहोत.

डमसक लागवड:
मित्रांनो, शेवगा हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केले जाते. शेवग्याच्या उत्पन्नासाठी हीच मुख्य कारणे आहेत. शेवग्याची पाने देखील अतिशय गुणकारी असून, त्याचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे शेवग्याच्या पालाला बाजारात मागणी असते.

शेवगा आणि पाला विक्रीमध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. हे दुहेरी उत्पादन देणारे पीक शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. पण सुधारित जातींची लागवड करणे गरजेचे आहे.

थार हर्षा

ही शेवग्याची एक सुधारित जात आहे. या जातीच्या शेवग्याच्या पाने गडद हिरव्या रंगाच्या असतात. या जातीच्या शेवग्याला फळे उशिराने लागतात. या जातीपासून वर्षाला सुमारे 314 शेंगा मिळतात.

संशोधकांचा दावा आहे की, या जातीपासून हेक्टरी 53 ते 54 टन उत्पादन मिळते. यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

तज्ञांचे मत असे आहे की, ही जात कोरडवाहू भागांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे. या जातीच्या शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते.

त्यामुळे या जातीचे शेवगे मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यामुळे बाजारात याची मागणी असते आणि चांगला भाव देखील मिळतो.

थार तेजस

ही देखील शेवग्याची सुधारित जात आहे. देशातील अनेक प्रमुख शेवगा उत्पादक राज्यांमध्ये या जातीची लागवड केली जाते. या जातीच्या शेवग्याची लांबी 45 ते 48 सेमी इतकी असते.

या जातीची लागवड कोरडवाहू भागातही होऊ शकते. कोरडवाहू परिस्थितीमध्येही या जातीतून चांगली कमाई करता येते, असा दावा केला जातो.

या सुधारित जातीची लागवद शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुम्हीही या जातीची लागवद करून चांगला नफा मिळवू शकता.

मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment