शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला तर त्यांच्या आर्थिक अडचणी होणार दूर? पहा सविस्तर माहिती..

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच पेरणी, कापणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. या तिन्ही योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे येतात.

पंतप्रधान पीक विमा योजना – या योजनेत सर्वांत पहिला क्रमांक आहे. शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते.

नैसर्गिक आपत्ती, कीड लागणे, दुष्काळ पडणे अशा कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत केली जाते.

किसान क्रेडिट कार्ड – ही शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना आहे. ही योजना १९९८ पासून सुरू असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ४% व्याजदराने जवळपास ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. आजपर्यंत जवळपास २.५ कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना – ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येतो. ६००० रुपयांची ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिली जाते.

दर चार महिन्यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment