Site icon मराठी बातम्या

शेत रस्ता मागणीसाठी अशा प्रकारे करा अर्ज संपूर्ण माहिती आत्ताच जाणून घ्या…!!

शेतकरी मित्रांनो शेत रस्ता मागणी अर्जाची पूर्ण प्रक्रिया कशी करायची?

रस्त्याची गरज बहुतांश शेतकरी बांधवांसमोर शेतजमीन मध्ये जाण्यासाठी रस्त्याची समस्या आहे.

जमीन विक्रीमुळे शेतजमिनीचे तुकडे होऊन मालकी बदलली आहे.

त्यामुळे पीक काढण्यासाठी आणि इतर कामांसाठी शेतात जाणे अवघड होत आहे.म्हणूनच शेत रस्ता तयार करणे महत्वाचे ठरते.

शेत रस्ता मागणीचा कायदा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ आणि कलम १४६ नुसार तहसीलदारांना शेतजमिनीच्या सीमेवरती रस्ता तयार करण्याचा अधिकार आहे.

शेतकरी रीतसर अर्जाद्वारे तहसीलदार कार्यालयात रस्त्याची मागणी करू शकतात.

शेत रस्ता मागणी अर्जासोबत कागदपत्रे

१) शेत जमिनीचा कच्चा व शासकीय नकाशा

२) चालू वर्षाचा सातबारा उतारा

३) लगतच्या शेतकऱ्यांची ना-हरकत प्रमाणपत्रे

४) लगतच्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा

५) लगतच्या शेतकऱ्यांचा पत्ता व जमिनीचा तपशील

६) जमीन वादाबाबतची कागदपत्रे (असल्यास)शेत रस्ता मागणी अर्ज लिंक शेतरस्ता तयार करा.

उन्हाळा चालू असतानाच शेत रस्त्याची मागणी केल्यास पावसाळ्यापूर्वी तो तयार होऊ शकतो.

त्यामुळे पिके काढण्यास अडचण येणार नाही. कायद्यानुसार शासनातर्फे शेतकऱ्यांना बैलगाडी रस्ता तयार करून दिला जातो.

इतर सोयी जसे पाईपलाईन देखील मिळू शकते. .. रस्त्याबरोबरच शेतजमिनीमध्ये पाईपलाईन आणण्यासाठीही अर्ज करता येतो.

शेजारच्या शेतकऱ्यांनी नकार दिल्यास कायदेशीर मार्गाने ते घेता येतील.

शेतकरी बांधवांना मदत करण्याचा उद्देश शेतकरी मित्रांना शासकीय योजना व कायद्याची माहिती करून देणे हा आहे.

बऱ्याचदा अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या न्युज पोर्टलवरून ती पुरवत असतो.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Exit mobile version