शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आली मोठी खुशखबर !!! सरकारकडून कर्जमाफी आणि अनुदानाची मोठी घोषणा…!!!

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविल्या आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना हीच शेतकरी कर्जमाफीची सगळ्यात मोठी योजना आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना (कर्जमाफी योजना महाराष्ट्र)
मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते.

शिवाय, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली होती, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूदही होती.

गेल्या वर्षभरात या शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये हे अनुदान जमा करण्यात आले आहे. मात्र, अनेक शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित राहिले आहेत.

काही तांत्रिक अडचणींमुळे आणि एकाच वर्षात दोनवेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही अपात्र ठरविल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता.

वर्तमान सरकारने नवीन नियम करून अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता या संदर्भात माहिती गोळा करत आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत ५० हजार रुपये अनुदान मिळणार.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच ५०,००० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. एकाच वर्षात दोनवेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या लाभासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेत जावे लागेल. तिथे दिलेल्या यादीत त्यांचे नाव शोधता येईल किंवा महा-ई-सेवा केंद्रात किंवा सीआयसी सेंटरमध्ये जाऊन ऑनलाइन यादी पाहता येईल.

यादीत नावासमोर लाभासाठी केवायसी करावी लागणार आहे. केवायसी झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा लाभ मिळेल.

शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात असतानाच्या परिस्थितीत ही योजना त्यांना दिलासा देणारी ठरेल.

शिवाय, शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणापासून मुक्तता होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment