Site icon मराठी बातम्या

मेंढी पालन योजना 2024, आता मेंढ्या खरेदी बरोबरच चाऱ्यासाठीही सरकारकडून मिळणार अनुदान!

महाराष्ट्र सरकारकडून मेंढी पालन योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र मध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेळीपालन तसेच मेंढी पालन केले जाते परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील मेंढी पालनांची संख्या कमी झालेली आहे आणि या वरती उपाय म्हणून सरकारकडून राजे यशवंत महामेष योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेमध्ये मेंढ्या खरेदी करताना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण संबंधित योजनेचा कसा लाभ घेऊ शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत तसेच या योजनेमध्ये कोणकोणते निकष लावण्यात आलेले आहे याची माहिती बघूया.

महत्वाचे मुद्दे:

मेंढी पालन योजना 2024

राजे यशवंत महामेष योजना ही मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील मेंढ्यांची घट रोखणे आणि मेंढीपालनाला चालना देणे आहे.

सरकारकडून या योजनेसाठी 45.81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राजे यशवंत महामेष योजनेचे स्वरूप म्हणजे या योजनेमध्ये 20 मेंढ्या आणि एक नर मेंढा खरेदी सरकार कडून तब्बल 75 टक्के अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

याचबरोबर संबंधित जनावरांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान पण देण्यात येईल म्हणजेच ज्यांना स्थायी स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी मेंढ्या ठेवून मेंढी पालन करायचे असेल त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल आणि ज्या व्यक्तींना भटकंती स्वरूपामध्ये मेंढी पालन करायचे असेल अशा व्यक्तींना पण या योजनेचा लाभ घेता येईल.

तसेच जर तुम्ही आधीपासूनच मेंढी पालन करत असाल आणि तुम्हाला नरमेंढा घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेताना तुमच्याकडे 20 ते 40 मेंढ्या असतील तर तुम्हाला एक नर मेंढा दिला जाईल जर 40 ते 60 मेंढ्या असतील तर दोन नर मेंढे दिले जातील आणि 60 ते 80 मेंढ्या असतील तर तीन नर मेंढे, 80 ते 100 मेंढ्या साठी चार नर मेंढे आणि शंभर पेक्षा जास्त मेंढ्यांसाठी पाच नर मेंढे 75 टक्के अनुदान ने प्रदान केले जातील.

मेंढी पालन योजना अर्ज

राजे यशवंत मेंढी पालन योजना अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाइटवरून अर्ज प्रदान करावा लागेल.

जर तुमची लाभार्थी पात्रता यादीमध्ये निवड झाली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. संबंधित योजनेचे अधिक माहिती आणि अर्ज दिनांक विषयीची माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क करू शकता.

मेंढी पालन योजना पात्रता

मेंढी पालन योजना कागदपत्रे

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Exit mobile version