Site icon मराठी बातम्या

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! दुष्काळी अनुदान होणार तुमच्या बँक खात्यात जमा…….जाणून घ्या

दुष्काळी अनुदान २०२४ खात्यात जमा होणार –

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांनो, सरकारकडून आनंदाची बातमी आहे. जानेवारीमध्ये शासनाने ४० दुष्काळी तालुक्यांसाठी २४०० कोटी रुपयांची मोठी रक्कम दुष्काळ अनुदानासाठी मंजूर केली

अनुदानाची रक्कम –

या दुष्काळ अनुदानाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला प्रती हेक्टर ८,५००/- रुपये इतकी मिळणार आहे.

लाभार्थी शेतकरी –

या दुष्काळ अनुदानाचा लाभ फक्त ज्यांची केवायसी (पंचनामा) झालेली आहे अशा २२.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

रक्कम खात्यात जमा –

हे दुष्काळी अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.

पंचनामा बाकी शेतकरी –

ज्या शेतकऱ्यांची अद्याप केवायसी (पंचनामा) बाकी आहे त्यांची यादी तयार करण्यात येत असून त्यांना लवकरच केवायसी करून घेण्यास सांगितले जाईल.

पावसाची नुकसान भरपाई –

याशिवाय, ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ३२ जिल्ह्यांसाठी २२४० कोटी रुपयांची भरपाई देखील जाहीर केली आहे.

बाधित तालुके व जिल्हे –

या अनुदानाचा सविस्तर तपशील आणि बाधित तालुका व जिल्ह्यांची यादी शासनाच्या जीआरमध्ये देण्यात आलेली आहे.

उदा. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (१,०१,९१२), सिन्नर (८५,८६५) व येवला (६३,८९८) तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या देण्यात आली आहे.

जीआर डाऊनलोड करा –

जर तुम्हाला हा जीआर स्वतःच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी “जीआर डाउनलोड करा” असा बटन दिसेल त्यावर टच करा .

Exit mobile version