Breaking News,टेन्शन वाढलं?आता जून मध्ये येणारा पाऊस लांबनीवर..!

महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसाचा मान्सूनवर होणारा परिणाम

शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो कारण खरीप हंगामामध्ये पाऊस पुढे ढकलला तर त्याचा पिकांच्या उत्पादनेते वरती मोठा परिणाम होतो.

आता जून मध्ये येणारा पाऊस लांबनीवर..

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये हवामानामुळे शेतकऱ्यांवरती वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला नाही त्यामुळे तेव्हा पिकांचे नुकसान झाले आणि त्यानंतर परत मार्च महिन्यामध्ये पण अवकाळी पाऊस पडला.

अवकाळी पावसाचा परिणाम:


एकीकडे उष्णतेची लाट पडलेली असतानाच दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढील कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये कसा पाऊस पडू शकतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

मान्सूनच्या येण्यास होणारी उशीर:


सर्वात प्रथम महाराष्ट्र मध्ये तळ कोकणामध्ये 7 जून रोजी दरवर्षी मान्सूनचा पाऊस हजार होतो आणि त्या दृष्टीने आता शेतकऱ्यांकडून पुढील हंगामासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे परंतु आता मध्ये चालू झालेला अवकाळी पाऊस वातावरणामध्ये मोठी बदल घडवून आणू शकतो.

पिकांच्या उत्पादनावरील संभाव्य परिणाम:


हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता हा कमी असलेला अवकाळी पाऊस जर पुढील काही दिवसांमध्ये वाढला तर त्याचा परिणाम मान्सून वरती पडेल आणि त्यामुळे मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी जय्यत तयारी सुरू आहे आणि यावर्षीच्या हंगामामध्ये चांगले उत्पन्न मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु हवामानाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो कारण खरीप हंगामामध्ये पाऊस पुढे ढकलला तर त्याचा पिकांच्या उत्पादनेते वरती मोठा परिणाम होतो.

आज कसा असेल हवामान:


आज महाराष्ट्र राज्य मध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, इत्यादी जिल्ह्यांमध्ये काही भागात गारपीट होऊ शकते.

महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो कारण खरीप हंगामामध्ये पाऊस पुढे ढकलला तर त्याचा पिकांच्या उत्पादनेते वरती मोठा परिणाम होतो. हवामानाच्या या बदलाची शेतकरी समुदाय आणि राज्य सरकार यांना काळजी वाटत आहे.

Leave a Comment